तुळजापूर  / प्रतिनिधी-

महाराष्ट्रातील महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणवाडीतील मुलांना ताजा आहार व टीएचआर पुरवठ्यासाठी वेगवेगळ्या जाचक अटी लादून महिला बचत गटांना डावलण्यात येत आहे. याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारसमोर जागरण गोंधळ घातला. 

यावेळी जवळपास ३० पेक्षा अधिक महिला बचत गटांच्या शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र स्टेट कन्झुमर फेडरेशनचे पोषण आहाराचे टेंडर रद्द करावे व टेंडरमधील जाचक अटी रद्द करत बचत गटांचा या योजनेत समावेश करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तुळजापूर येथील अष्टभुजा महिला बचत गटाच्या अध्यक्षा मीना सोमाजी, प्रतीक्षा डोईफोडे, आशा राखुंडे, कल्पना गायकवाड, रेणुका माने, किरण निंबाळकर, माधुरी गुचकोडे, छाया शेरकर, कोमल महाजन, हरदा शेख, उज्वसा मुंडे, अनिता तोडकरी आदींसह उस्मानाबाद, उमरगा, नळदुर्ग येथील बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.


 
Top