उस्मानाबाद / प्रतिनिधी-

असंवेदनशीलतेची परिसीमा ओलांडलेल्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करत कृषी पंपाची वीज पुरवठा खंडित करू नये, खंडित केलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करावी या मागणीसाठी दि. ०३.१२.२०२१ रोजी उस्मानाबाद शहरातील अधीक्षक अभियंता, महावितरण यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष,  नितीन काळे यांनी दिली आहे.

   सदरील आंदोलनाबाबत जिल्हयाचे नेते प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हयाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी नेताजी पाटील, विक्रम मालक देशमुख, राजाभाऊ पाटील, संतोषदादा बोबडे, राजसिंह राजेनिंबाळकर, विजय शिंगाडे, रामदास कोळगे, निहाल काझी, नामदेव नायकल, दत्तात्रय सोनटक्के, राहुल काकडे, अभय इंगळे, अजित ‍पिंगळे, अरुण चौधरी, यांच्यासह भाजपाचे असंख्य पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

 
Top