उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील एक लाख ७० हजार ४४६ पाच वर्षाच्या आतील बालकांना २३ जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहिमेतून डोस पाजण्यात येणार आहे. यात जास्तीत जास्त बालकांनी डोस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी पल्स पोलिओ लसीकरणाची पूर्व तयारीची बैठक दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ . के .के. मिटकरी यांनी माहिती देताना लसीकरणाची तयारी आरोग्य यंत्रणेने पूर्ण केली. त्यासाठी ग्रामीण भागात एक हजार १९८ आणि शहरी भागात १२२ लसीकरण बुथची सोय केली. लसींची मात्रा देण्यासाठी तीन हजार ३३७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याबाबतची सर्व तयारी आता पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


 
Top