तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात टीपीओ विभागामार्फत सर्व अंतिमवर्षातील वर्गाच्या विद्याथ्यांसाठीं क्यू - स्पाइडर प्रा.लि. या नामांकित कंपनी मार्फत ऑनलाईन कॅम्पस ड्राईक घेण्यात आला . त्यामध्ये या महाविद्यालयाच्या एकुण 120 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व त्यांची ऑनलाईन अॅप्टिटयूड टेस्ट व ग्रुप डिस्कशन घेण्यात आले त्यातून 19 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली . 

निवड झालेल्या  विद्यार्थ्यांना तीन महिन्याचे कंपनी पूरक फुकट ट्रेनिंग देवून त्यांची नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत निवड करून घेतात .   निवडीबद्यल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.डी. पेरगाड , उपप्राचार्य प्रा.आर. जी . मुदकण्णा , टीपीओ प्रा . छाया घाडगे , टीपीओ सेल प्रमुख प्रा . पी . ए . हंगरगेकर , संगणक विभाग प्रमुख प्रा.आर.एच. आडेकर, अणुवैजिक व दुरसंचार विभाग प्रमुख डॉ . डी . डी . खुमणे व यांत्रिकी विभाग प्रमुख प्रा . व्ही.बी. पानसरे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . या यशाबद्दल  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष  तु . म . मंदीर संस्थान  कौस्तुभ दिवेगावकर , उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद तथा विश्वस्त  डॉ. योगेश खरमाटे , तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन श्री . तु . म.मंदीर संस्थान मा श्रीमती योगिता कोल्हे , तुळजापूरचे आमदार तथा महाविद्यालयाचे विश्वस्त  राणजगजीतसिंह पाटील , नगराध्यक्ष तथा विश्वस्त सचिन रोचकरी , तुळजापूर तहसीलदार तथा विश्वस्त श्री सौदागर तांदळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे .

 
Top