उस्मानाबाद / प्रतिनिधी-

काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांच्या वतीने शहरातील शेंदर्‍या मारुती मंदिर, सांजावेस गल्ली येथे शुक्रवारी दि. 24 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची मोफत नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबीरात 355 कुटुंबांचे महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे प्रमाणपत्र (कार्ड) नोंदणी करून देण्यात आली. शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष विश्वास शिंदे यांच्या शुभहस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस जावेद काझी, विश्वजित शिंदे, काशीनाथ दिवटे, नवनाथ डांगे, बबन मुंडे, धनंजय मालखरे उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी अग्निवेश शिंदे, अभिजित शिंदे, सुशील मालखरे, ऋषिकेश मुंडे, संताजी शिंदे, धनंजय मुंडे, निलेश मुंडे, राजू चिद्रवार, अजय बोधले, शरीफ सौदागर, सोनू बनसोडे यांनी परिश्रम घेतले.

 
Top