उस्मानाबाद /प्रतिनिधी- 

 कोविड महामारीच्या काळातही ज्ञानाची गंगा अविरतपणे सुरू ठेवणार्‍या उस्मानाबाद नगर परिषदेतील गुणवंत शिक्षक व शाळांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पालिकेच्या सर्व 26 शाळांचा नामविस्तार सोहळाही संपन्न झाला.

उस्मानाबाद शहरातील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे शनिवारी दि. 18 डिसेंबर रोजी हा कार्यक्रम झाला. 

आमदार कैलास घाडगे पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिक्षण सभापती सिद्धेश्वर कोळी, प्रशासन अधिकारी तथा उपमुख्याधिकारी पृथ्वीराज पवार, पालिका अधीक्षक संजय कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, बाबा मुजावर, शिवाजी पंगुडवाले, सोमनाथ गुरव, नितीन शेरखाने, विशाल शिंगाडे, तुषार निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

खंगले संतोष बाबुराव (मुख्याध्यापक), तानाजी मालुसरे नगर परिषद शाळा क्रमांक 17, श्रीमती शेख नसीम बेगम (सहशिक्षक), फातेमा बीबी नगर परिषद शाळा क्रमांक 8, जाधव अरविंद रामराव (मुख्याध्यापक), छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 11 यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आदर्श शाळा पुरस्कार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ नगर परिषद शाळा क्रमांक 18, भाणूनगर या शाळेला देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि न.प. शाळांचे नामविस्तार फलकाचे अनावरण करून करण्यात आले. कार्यक्रमाला सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहुराज लोमटे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सिद्धेश्वर कोळी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पृथ्वीराज पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोप राष्ट्रगीत गायन करून करण्यात आली.

 
Top