ॲड.व्यंकट गुंड यांची केंद्रीय वाहतूक मंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शिवली मोड ते उस्मानाबाद हा ४९ किलोमीटर अंतराचा रस्ता जोड रस्ता म्हणून केंद्रीय महामार्ग विभागाने मंजूर करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. व्‍यंकट गुंड यांनी नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय महामार्ग परिवहन मंत्री नितिन गडकरी लातूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्या वेळी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा असणारा राष्ट्रीय महामार्ग ३६१ ते राष्ट्रीय महामार्ग ५२ हा मार्ग शिवली मोड,टेंभी कोळेवाडी,वरवडा,शिवली पाडोळी (आ), चिखली, सारोळा,सांजा आणि उस्मानाबादला जोडणारा आहे. ४९ किलोमीटर अंतर असणारा हा रस्ता अहमदनगर ते हैदराबाद सर्वात जवळच्या मार्गाला जोडणारा रस्ता असून हात रस्ता पुढे पुणे-मुंबई साठी देखील जोडला गेलेला आहे. केंद्रीय महामार्ग विभागाने हा जोड रस्ता म्हणून मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात बाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही ॲड. व्यंकट गुंड यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी दिल्याचे समजते.

 
Top