परंडा / प्रतिनिधी :-

परंडा शहरातील रहिवाशी  व सध्या शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधि विभागांमध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत असणारे डॉ. गजानन शंकरराव राशीनकर  यांनी ब्रेस्ट कॅन्सर वर केलेल्या उपयुक्त संशोधनासाठी रविवार ता.७ रोजी मुख्यमंञी कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते “ब्रँड कोल्हापूर” या नामवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 डॉ. राशीनकर व त्यांचे विद्यर्थी डॉ.प्रकाश बनसोडे यांनी महिलांमध्ये आढळणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनांच्या कर्करोगावर प्रभावी ठरलेली रासायनिक संयुगे संशोधनातून विकसित केली आहेत. सदर संशोधनामध्ये ही संयुगे मानवी शरीरातील सामान्य पेशींना अपाय न करता कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करतात असे दिसून आले आहे. सदर संशोधनाची दखल घेऊन भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने त्यांना पेटंट प्रमाणपत्र दिले आहे. याची दखल घेऊन रविवारी ता.७ नोव्हेंबर  रोजी सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव  विकास खारगे यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज बंटी पाटील व  आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या समारंभात  क्रीडा, सामाजिक, साहित्य, कला, शिक्षण, उद्योग  क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडु, मान्यवरांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात  आले.या यशाबद्दल डाॕ.राशिनकर यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.


 
Top