तालुक्यातील प्रतिष्ठेची सारोळा (बुद्रुक) विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध काढण्यात आली आहे़ सोसायटीच्या १३ जागेसाठी १३ अर्ज दाखल झाल्याने सर्व उमेदवार बिनविरोध निवडूण आले आहेत़ बिनविरोध निवडीनंतर आ़ कैलास पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, माजी पं़ स़ सदस्य सुरेश देवगिरे, माजी चेअरमन अॅड़ निवृत्ती कुदळे यांच्यासह विजयी उमेदवार व समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला़
उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली होती़ सारोळा, सकनेवाडी व शिंदेवाडी अशा ३ गावाचे कार्यक्षेत्र असलेल्या सोसायटीचे एकूण १०७६ सभासद आहेत़ १३ पैकी सर्वसाधारण ०८, महिला ०२, ओबीसी ०१, व्हीजेएनटी ०१, अनु,जाती ०१ अशा जागा निवडूण द्यावयाच्या होत्या़ सारोळा गावचे सुपूत्र, आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कैलास घाडगे-पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते़ संस्थेची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने सर्वांनी सामंजस्याने घेवून निवडणूक बिनविरोध काढावी असे आवाहन केले होते़ त्याला गावातील सर्वच पक्ष, संघटना, विशेषत: सभासद, मतदार, नेतेमंडळींनी सकारात्मक प्रतिसाद दिला़ त्यामुळे सोमवारी (दि़२९) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १३ जागेसाठी १३ अर्ज दाखल झाले़ त्यामुळे सर्व १३ उमेदवार बिनविरोध निवडूण आले़ औपचारिक घोषणा होणे आहे़ बिनविरोध निवडीसाठी आ़ कैलास पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सोसायटीचे माजी चेअरमन अॅड़ निवृत्ती कुदळे, भाजपचे माजी पं़स़सदस्य सुरेश देवगिरे, प्रशासकीय मंडळाचे माजी चेअरमन रमेश रणदिवे संचालक महावीर देवगिरे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार छत्रपती रणदिवे, सरपंच प्रशांत रणदिवे, उपसरपंच श्रावण देवगिरे, तुकाराम मसे, सकनेवाडीचे सरपंच अतुल चव्हाण, सुधाकर देवगिरे, सुधाकर मसे, मेजर मसे आदींनी परिश्रम घेतले़ बिनविरोध निवडीनंतर आ़ पाटील विजयी उमेदवार, सभासद उपस्थित मंडळींनी गुलालाची उधळण करुन जल्लोष केला़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बालाजी सावतर यांनी काम पाहिले़