जिल्हातील विज बिल वसुलीसाठी महावितरणणे शेतक-यांच्या शेतातील रोहित्राचा विज पुरवठा बंद केला त्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहे. निसर्गाच्या लहरीपणा मुळे यंदाचा खरीप हंगाम हातचा गेला आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे सोयाबिनचे ढिगच्या ढिग पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहेत.
बहुतांश शेतक-यांच्या शेतात पाणी उभा राहील्याने सोयाबिनचे फड कुजून गेले यामुळे शेतक-यांना मोठा अर्थिक फटका सहन करावा लागला आता पाणी मुबलक प्रमाणात झाले असुन त्याचा उपयोग किमान रब्बीच्या पिकासाठी होईल या आशेवर शेतक-यांनी रब्बीची पेरणी केली परंतु महावितरणणे विज पुरवठाच बंद केल्याने पिकांना पाणी देण्यासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होत आहे.
यासंदर्भात शेतक-यांना कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास यासाठी शिवार हेल्पलाईन ८९५५७७१११५ ला संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशन चे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.
यासाठी मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी एम.एच.आय ,तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी उस्मानाबाद , जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.