उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित स्वाभिमानी शिक्षक संघटनेचा मराठवाडा विभागाचा मेळावा शहरातील रायगड फंक्शन हॉलमध्ये घेण्यात आला. या वेळी काही शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मेळाव्यासाठी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मेळाव्यामध्ये २०२०-२१ शैक्षणिक वर्षातील स्वाभिमानी शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले. परंडा येथील रा. गो. शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपाताई साळवे,परळी येथील सौ. मुंडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मेळाव्याचे आयोजन स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे मराठवाडा समन्वयक डॉ. बिभीषण भैरट यांनी केले होते.कार्यक्रमासाठी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पुजाताई मोरे, गजानन बंगाळे-पाटील, रवींद्र इंगळे, तानाजी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, शिक्षक संघटना वैचारिक खाद्य पुरवणारी असून, म्हणून व स्वाभिमानी शिक्षक घडवण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण व निर्णय घेण्यासाठी मोठा लढा उभा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लढा उभा करण्यात येणार आहे. ही शिक्षकांची स्वाभिमानी चळवळ चांद्यापासून बांद्यापर्यंत वाढवून महाराष्ट्रात नवीन सांस्कृतिक व सामाजिक वाटचाल निर्माण करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पूर्ण ताकद स्वाभिमानी शिक्षकांच्या पाठीशी उभी केली जाईल. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्योतीताई सोनवणे यांनी केले.

 
Top