उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद येथे जिल्हास्तरीय अटल भूजल योजनांतर्गत एक दिवसीय कार्यशाळा मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीतील डी.पी.डी.सी.हॉल, डिपीसी सभागृहात  घेण्यात आली.  या कार्यशाळेचे प्रथम सत्रामध्ये जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावंकर यांच्या हस्ते कलशपूजन व दीप प्रज्वलन करुन  उद्घाटन करण्यात आले.अटल भूजल योजना विषयी अटल भूजल योजनांतर्गत्‍ समाविष्ट गावातील ग्रामसेवक, तलाठी, कषी सहायक व सरपंच इतर कर्मचारी यांना श्री.दिवेगावकर मार्गदर्शन केले.

त्यानंतर कार्यशाळेतील प्रमुख पाहुणे  जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता   यांनीही संबंधित गावातील कर्मचा-यांना अटल भूजल योजना गतीशील करण्यासाठी  योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना केल्या.  या कार्यशाळेस 120 कर्मचारी उपस्थित होते. तसेच या कार्यालयाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक  एस. बी. गायकवाड यांनी जलसुरक्षा आराखडा व पाण्याचा ताळेबंद याविषयी माहिती देऊन योजनेच्या यशस्वेतेबाबत सहाकार्य करण्याचे अहवान केले. सहायक भूवैज्ञानिक श्रीमती डॉ.एस एस.शिंदे यांनी सूत्रसंचलन केले.श्री.दापेकर यांनी आभार मानले.


 
Top