तेर /प्रतिनिधी 

उमानाबाद जिल्ह्यांतील बागायत क्षेत्रासह उत्पन्न वाढीसह शेत शिवारातील जलस्रोताच्या पाणी पातळीत वाढ व्हावी तसेच जिल्हा सदैव हरितक्रांतीमुळे सुजलाम सुफलाम राहावा म्हणून जिल्ह्यातील लहान मोठे नदी- नाले- ओढयावर कोट्यावधी रुपये खर्च करून मोठ्या  संख्येने कोल्हापूरी बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. परंतु याच कोल्हापूरी बंधाऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे पाटबधारे विभागासह जिल्हा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्यामुळे जिल्ह्यांतील अनेक कोल्हापूरी बंधाऱ्यांची वाट लागली असून अनेक बंधाऱ्याचे दरवाजे चोरी गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पडलेल्या पावसाचे लाखो लिटर पाणी यंदाही पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभारामुळे वाया जात आहे.  

त्यातच प्रत्येक दोन- तीन वर्षांत उस्मानाबाद जिल्ह्यांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असल्याने भिषन चारा टचाईसह पाणी टचाईचे संकट कोसळते .त्यामुळे जिल्ह्यातील शहरी भागांसह ग्रामीण भागातील नागरीकासह वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात तसेच जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळी परिस्थितीत चारा पाणी टंचाई निवारणासाठी कोट्यावधी रुपयांचा चुराडा करण्यात येतो .तरी पण जिल्ह्यातील नागरीकाना अनेक समस्या सामोरे जावे लागतेे. विशेष म्हणजे प्रशासनाकडून पाणी आडवा पाणी जीरवा यांच्या विषयी प्रत्येक वर्षी जनजागृती करण्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला जातो. परंतु पाटबधारे विभागासह जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रत्येक वर्षी कोल्हापूरी बंधाऱ्यांची दुरुस्ती न केल्यामुळे पावसाळ्यात पडलेल्या पावसाचे पाणी आजघडीला बंधाऱ्यातून वाया जात आसताना ही कोल्हापूरी बंधाऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे मात्र पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून साफ दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे जिल्हाभरातील कोल्हापूरी बंधाऱ्याच्या  देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देऊन वाया जाणारे पाणी आडवण्यासाठी प्रयत्न करतील का? असा प्रश्न शेतकरी वर्गासह नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. त्यातच तेरणा नदी व लाडजा ओढयावर असलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली. त्यामुळे लाखो लिटर पाणी आले तसेच वाहून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आतातरी पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी तेरणा नदी व लाडजा ओढयावरील बंधाऱ्यांच्या दूरुस्थीचे काम हाती घेऊन वाहून जाणारे पाणी आडवण्याचा प्रयत्न करतील का असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

 
Top