उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिराच्या दर्शन मंडपाच्या तिसऱ्या मजल्यावर जात, सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घातली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंदिराच्या विश्वस्त, व्यवस्थापक तथा तहसीलदारांनी मंदिराच्या सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे, यासाठी मनाई आदेश जाहीर केलेले आहेत. त्यानंतरही शनिवारी शहरातील अोंकार भिसे यांनी दर्शन मंडपाच्या तिसऱ्या मजल्यावर व मंदिरात प्रवेश केला. सुरक्षा रक्षकांसोबत हुज्जत घातली. त्यामुळे नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले. त्यामुळे मंदीर प्रशासनाचे सहायक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले यांच्या तक्रारीवरून भिसे यांच्या विरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


 
Top