उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील महिलांना ब्युटी पार्लर च्या माध्यमातून स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी स्वयंसिद्ध स्वयंरोजगार मुखी प्रशिक्षण संस्था , सौंदर्य एजन्सी व वैष्णवी ब्यूटी पार्लर उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते .

उस्मानाबाद शहरातील वैष्णवी ब्यूटी पार्लर च्या संचालिका सारिका राजपूत यांनी प्रशिक्षणामध्ये महिलांना दोन महिने ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले . प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे रमेश पाटील , ज्योती राजेनिंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती व  पाहुण्यांच्या हस्ते ब्युटी पार्लर किटचे प्रशिक्षित महिलांना वाटप करण्यात आले.


 
Top