उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील आळणी येथे जगदगुरू तुकाराम महाराज मंदिर,वारकरी शिक्षण संस्था,गोशाळा,वृदाश्रम हे प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी आज रोजी शनिवार दि 27 रोजी  दुपारी 1 वाजता शुभारंभ गुरूवर्य जगदगुरू तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज श्री क्षेत्र देहू कानोबा महाराज देहूकर यांच्या शुभपावन हस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी महाराजांनी या उपकृमास शुभेच्छा देऊन मंदिर उभारणीसाठी सर्वांनी सढळ मदत करण्याचे आवाहन केले.तसेच आज गुरूवर्य भगवान भाऊ येडशीकर यांच्या पुण्यतीथी निमित्त तुकोबाराय पावन धाम अध्यक्ष ह भ प महादेव महाराज बोराडे शास्त्री,यांच्या किर्तनाचा कार्यक्रम सकाळी १० ते १२ या वेळेत झाला.या कार्यक्रमास ह भ प भारत महाराज कोकाटे,ह भ प गुरूवर्य महादेव महाराज तांबे,ह भ प ज्ञानेश्वर महाराज तांबे,ह भ प आप्पा महाराज जावळे,ह भ प बापु महाराज भड,ह भ प बाळासाहेब महाराज वीर,ह भ प ज्ञानेश्वर महाराज जवळेकर,ह भ प गणपत महाराज येलकर,ह भ प प्रमोद महाराज माने अनसुर्डा,तसेच तेली समाज संघटनेचे राज्यउपाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,प्रदिप भैय्या वीर,राजेंद्र वीर,ग्रा प सदस्य अनंत खोबरे,धनंजय कापसे,तंटामुक्त अध्यक्ष शाम बापु लावंड,सुनिल माळी,श्ररीपाल वीर,रमाकांत लावंड,नेताजी दादा वीर,नंदकुमार तात्या वीर,दिलीप दादा वीर,भैय्या गुरूजी,लक्ष्मण भांडेकर यांच्यासह गावातील नागरीक व उस्मानाबाद,खेड,खामगाव,शिंगोली,येडशी,भडाचीवाडी,यांच्यासह परीसरातील भावीक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

 
Top