भाजपा मराठवाडा संघटन मंत्री  संजय कोडगे व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बैठक संपन्न झाली . सर्वप्रथम पंडित दीनदयाल उपाध्याय व डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, या कोरोना सारख्या महामारी मध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिक मृत पावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ऍड खंडेराव चौरे यांनी शोकप्रस्ताव घेतला,
  भाजप जिल्हा समन्वयक नेताजी पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदन ठराव सादर केला ,त्यानंतर भाजप बुद्धिजीवी प्रकोष्ठचे संयोजक दत्ता  कुलकर्णी यांनी राजकिय अराजकता या विषयावर सखोलपणे विश्लेषण केले .नंतर संजय कोडगे यांनी भाजपच्या विविध कार्यक्रमांचे मार्गदर्शन करताना ते यशस्वी पणे राबविण्यात यावेत असे सांगितले.
   वाशी तालुक्यातील कॅप्टन संकेत चेडे यांची भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल भाजपा धाराशिव जिल्ह्याच्या वतीने संजय कोडगे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उस्मानाबाद जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी सौ. अर्चना अंबुरे यांची निवड झाल्याबद्दल भाजपा उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने संजय कोडगे  यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे यांची पंचायत समिती उस्मानाबादच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  या बैठकीला जिल्ह्यातील विविध मोर्चा अध्यक्ष ,सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष,मंडळ अध्यक्ष ,जिल्हा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top