उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

देशाच्या संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधानाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती. या घटनेचे स्मरण करण्यासाठी संविधान दिवस साजरा केला जातो. याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांनी उपस्थित अधिका-यांसोबत संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, राजकुमार माने, शुभांगी आंधळे, तहसीलदार प्रविण पांडे, बालाजी शेवाळे , नायब तहसीलदार पंकज मंदाळे,अर्चना मैंदर्गी आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top