एकजुटीने लढण्याचा केला निर्धार


तुळजापूर: / प्रतिनिधी-

महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह समविचारी संघटनांनी तुळजापूर नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी वज्रमूठ आवळली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात  गुरूवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत  आगामी निवडणूक महाविकास आघाडी व घटक पक्ष, संघटनांनी एकजुटीने लढून सत्ता काबीज करण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती शेकापचे तालुका सरचिटणीस किरण खपले व जिल्हा सदस्य उत्तम अमृतराव यांनी दिली. महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे पालिकेची यावेळेसची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी याकडे सवार्र्ंचे लक्ष लागले आहे.

शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात गुरूवारी सायंकाळी महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत आगामी नगर परिषद निवडणुकीसंदर्भात बैठक घेण्यात आली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी निवडणूक एकजुटीने लढून सत्ता काबीज करण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीस  शिवसेनेचे शहरप्रमुख सुधीर कदम, माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, बाळासाहेब शिंदे, बापू नाईकवाडी, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष लखन पेंदे, काँग्रेसचे अमोल कुतवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद जगदाळे, बंटी गंगणे, सचिन कदम, अ‍ॅड.विवेक शिंदे, अल्पसंख्यांक विभागाचे तौफिक शेख, लहुजी सेनेेचे आकाश शिंदे, विद्यार्थी काँग्रेसचे विराज जगदाळे, वंचित आघाडीचे बालाजी शिंगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, शेकापचे तालुका सरचिटणीस किरण खपले,  किरण घाटशिळे, राजू माने, उमेश भिसे, नवनाथ जगदाप, कल्याणराव भोसले, शिवनाथ भांजी, नगरसेवक राहुल खपले, भोलेनाथ कदम, उत्तम अमृतराव, विलास इंगळे आदीसह महाविकास आघाडीतील पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

 
Top