तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यात महसुल विभागाने   जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर  उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनानुसार शुक्रवार दि.19 रोजी विविध ठिकाणी धाडी घालुन तेरा अनाधिकृत खडी केंद्र सिल केले. यात बड्या बड्या मंडळीच्या स्टोन क्रेशरचा समावेश असल्याने अनेकांचे धाबे दणाणुन गेले आहेत.  

तुळजापूर तालुक्यात शासनाचा करबुडवुन व विना परवाना अवैधपणे खडी केंद्र व्यवासाय सुरु असल्याची माहीती समजली होती. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी  कारवाई चे आदेश जारी केले होते. त्यानुसार सौदागर तांदळे तहसिलदार तुळजापूर , चंद्रकांत शिंदे ना.त.म -1 व  संतोष पाटील ना.त. म -2 .  यासमवेत  बी . एस . जगताप मं.अ., ए . आर . यादव मं.अ. तसेच संबंधित सज्जाचे तलाठी उपस्थित होते . तसेच दुसऱ्या पथकात श्री . संतोष पाटील ना.त.म -2 यासमवेत श्री . जे . एस . गायकवाड मं.अ. , श्री.पी.एस. भोकरे मं.अ. श्री . टी . डी . कदम तलाठी ,  टी. के . रूपनवर तलाठी तसेच संबधित सज्जाचे तलाठी  यांनी  तुळजापूर तालुक्यातील अनाधिकृत असलेले एकुन 13 स्टोन क्रशर सिल केले सदर स्टोन क्रशर धारक यांचेकडे प्रदुषण परवाना तसेच   जिल्हाधिकारी यांचे खदान पट्टा परवाना तसेच इतर आवश्यक परवाने नसल्याने तसेच वर्षानुवर्षे सदर क्रशर कडे प्रचंड प्रमाणात थकबाकी असल्याने सदर स्टोन क्रशर सिल करण्यात आलेले आहेत. 

सदर स्टोन क्रशरबाबत प्रदुषण बाबत तक्रारी तसेच शेतकरी यांच्या वारंवार तक्रारी प्राप्त असल्याने सदर स्टोन क्रशर सिल करण्यात आले आहेत . सिल केलेले स्टोन क्रशर खालीप्रमाणे आहेत . 1. एस टी पी एल स्टोन क्रशर मौ . अरबळी गट नं . 94 2. विशाल स्टोन क्रशर मौ . सिंदफळ गट नं . 184 3. मलबा स्टोन क्रशर मौ . तुळजापूर गट नं . 18 4. जगदंबा स्टोन क्रशर मौ . मोर्डा गट नं . 75 5. घोडके स्टोन क्रशर मौ . रायखेल 6. पवार स्टोन क्रशर मो . अणदूर गट नं . 96/1/1 7. चंद्रशंकर स्टोन क्रशर मौ . अलियाबाद गट नं . 151 8. यशवंत स्टोन क्रशर मौ . सावरगाव गट नं .298 सदर स्टोन क्रशर बाबत वसुलीची पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात येवुन पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील . Scanned with CamScanner 10 . 9. मोरया स्टोन क्रशर मौ . तामलवाडी गट नं . 293 श्री स्टोन क्रशर मौ . पिंपळा बु . गट नं . 174 एस . जी . स्टोन क्रशर मौ . भातंब्री गट नं . 32 / ब कार्लेश्वर स्टोन क्रशर मौ . जळकोट गट नं . 377


 
Top