तुळजापूर / प्रतिनिधी  

 तुळजापूर येथे सुनील चव्हाण विचार मंचच्या वतीने तिसर्‍या वर्षी तुळजापूर होम मिनिस्टर स्पर्धा झाली. जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर आयोजित स्पर्धेमध्ये तुळजापूर शहरातील महिलांचा प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर, उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी चंचला बोडके, शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शामल वडणे, डॉ.शुभांगी धीरज पाटील, माजी नगराध्यक्षा मंजुषा मगर, डॉ.कामाक्षी मलबा यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून चला हवा येऊ द्या मधील सुप्रसिद्ध अभिनेते उमेश जगताप, अभिनेते शंतनु गंगणे, कांचन गंगणे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. येथील नगरसेवक व कार्यक्रमाचे आयोजक सुनील रोचकरी व प्रियंका सुनिल रोचकरी यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत सुप्रसिद्ध मराठी अभिनेते उमेश जगताप व शंतनू गंगणे यांचे खास आकर्षण राहिले. यावेळी तिसर्‍या तुळजापूर होम मिनिस्टर होण्याचा मान येथील पल्लवी डोके, स्वाती कावरे, अश्विनी हिरळीकर, मानसी कोंडो, मोक्षदा कोल्हे, कलावती व्यवहारे यांना मिळाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या विजेत्या महिलांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी मयूरी अभय पाटील, कविता साळुंके, अन्नपूर्णा भालेकर, अमृता वाघमारे, अपर्णा कावरे, योगिनी शहापुरे, बाल गायिका सहयाद्री मळेगावकर आदींची उपस्थिती होती. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का सरकटे, कार्यक्रम आयोजक प्रियंका रोचकरी, नगरसेवक सुनील रोचकरी यांच्या हस्ते सहा लकी ड्रॉ व न्यु होममिनिस्टर स्पर्धेतुन तुळजापूरच्या तिसर्‍या होम मिनिस्टर ठरलेल्या सहा विजेत्या पैठणीच्या मानकरी महिलांसह शंभर प्रोत्साहनपर बक्षीसांचे वितरण करण्यात आले. तुळजापूरच्या तिसर्‍या होम मिनिस्टर अर्थात मानाच्या पैठणीचा मान मिळवून विजेत्या ठरलेल्या पल्लवी डोके, स्वाती कावरे, अश्विनी हिरोळीकर, मानसी कोंडे, मोक्षदा कोल्हे, कलावती व्यवहारे यांना एलईडी टीव्ही, आटा चक्की, वॉशिंग मशीन, फ्रिज, ओव्हन, मिक्सर व पैठणी स्वरूपात बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय पहिल्या तीन लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्या महिलांना मानाची पैठणी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले.कार्यक्रमासाठी करण साळुंके, सुदर्शन वाघमारे, राहुल भालेकर, सचिन सुरवसे, दादा अमृतराव, शिवाजी अमृतराव, विशाल रोचकरी, विनीत रोचकरी, अक्षय सुरवसे, अभिषेक साळुंके, प्रेम प्रयाग, दत्तात्रय कदम आदींनी परिश्रम घेतले.


 
Top