परंडा / प्रतिनिधी  

तालुक्यात यंदा  झालेली अतिवृष्टी व मजुरांच्या मजुरीत झालेली वाढ  उत्पादन कमी खर्च जास्त असे शेतीचे समीकरण होऊन बसल्याने शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसाय आता तोटयाकडे घेऊन जाणाराच ठरू लागला आहे असे शेतकरी महमंद रफी काझी यांनी आमच्या प्रतिनिशी बोलताना सांगीतले .

  परंडा येथील सेवानिवृत्त प्राध्यापक महमंद रफी काझी यांची शहरालगत ४० एकर शेती आहे . सध्या शेतात सात एकर ऊस तर १२ एकर सोयाबीन असुन . सोयाबीनची एक महिणाभर उशीराने पेरणी केली होती . सध्या सोयाबीनची काढणी सुरु आहे . शेती व्यवसाय तोटयाकडे घेऊन जाणाराच ठरू लागल्याने शेतकरी काझी यांनी खर्चात बचत करण्याच्या हेतूने पुरुषांऐवजी महिला मजुरांकडुन शेतीची कामे करून घेत आहेत .

   परंडा तालुक्याची ओळख तशी पर्वापावर दुष्काळी तालुका म्हणुनच आहे .दर वर्षीच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्यामुळे या तालुक्यातील शेती व्यवसायाला चालना मिळणे अवघड होत आहे . निसर्गाचा लहरीपणा व हवामानातील बदलामुळे तालुक्यातील शेतकरी नेहमीच अडचणीत येतो . मागील दोन वर्षापासुन शेतीतुन काडीमात्र पदरात पडला नाही असे काझी यांनी सांगीतले . तालुक्यातील शेतकरी पार खचून गेला आहे . तशातच मजुरांच्या मजुरीत झालेली वाढ आणि शेतीतुन उत्पन्न नसताना भरमसाठ खर्च करताना नाकी नऊ येतो . पुरुष मजुरांची वाढती मजुरी ऐवजी महिला मजुर लावुन शेतीची कामे करून घेत आहेत . उत्पादनात कमालीची घट येत असल्याचे शेतकरी काझी यांचे म्हणणे आहे .एकंदरीत शांतीत खर्च भरमसाठ आणि त्यामानाने उत्पन्न निघेना आशी परिस्थीती शेतीची झाल्याने शेतकरी हातघाईला आला आहे


 
Top