परंडा / प्रतिनिधी :- 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांची आसू येथील शेती व ग्रामिण विकास संशोधन मंडळाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.सन१९९४ मध्ये समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यानी स्थापन केलेले हे मंडळ शेती आणि शेतकऱ्याच्या मुलभुत प्रश्नासाठी काम करीत असुन रस्ते,सिंचन,शेतकऱ्याचे कर्ज योजना,स्त्रीयासाठीच्या योजना यांची माहिती ग्रामस्थाना देत आहेत.

या मंडळाच्या अध्यक्ष पदी निवड झालेल्या डॉ.दिपा सावळे यानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या इतिहास अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदही भुषविले आहे.तसेच त्यांनीं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर इतिहास संशोधनाचे अनेक शोधनिबंध सादर केले आहेत.प्राचार्या डॉ. दीपा सावळे यांनी परंडा तालुक्यातील जल व्यवस्थापन यावर एक प्रकल्प पूर्ण केला आहे.तसेच परंडा तालुक्यातील परित्यक्ता महिलांवरही सर्वेक्षण करून एक पुस्तक लिहिले आहे.पन्नालाल सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या सभेत डॉ.दीपा सावळे यांची एकमताने निवड झाली.प्राचार्या डॉ.सावळे यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले आहे.अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना सहकार्य केले आहे .राष्ट्र सेवादल ,आपलं घर अशा विविध सामाजिक चळवळीमध्ये स्वतःचं कुटुंब समजून  आपल्या कार्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याचा लेखाजोखा पाहता त्यांची ही निवड एकमताने करण्यात आली . या सभेत मंडळाचे उपाध्यक्ष हरिदास लिमकर ,सचिव विलास वकील,खजिनदार कल्याण जगताप यांची निवड करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ.चंद्रकांत मोरे ,शब्बीर मुलाणी,गुंडू पवार,मनिषा पवार,सुधीर खाडे ,अनिता नवले आदी सदस्य उपस्थित होते.प्राचार्य डॉक्टर दिपा सावळे यांच्या झालेल्या निवडीमुळे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,कर्मचाऱ्यांनी  त्यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top