उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना स्प्रिंकलर संचची मोठी गरज असते. मात्र अतिवृष्टीसह विविध संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सर्व रक्कम भरून संच खरेदी करणे शेतकऱ्यांना मुश्किल झाले होते. हीच बाब ओळखून ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी शेतकऱ्यांना अनुदानावरील संच उपलब्ध करून दिले आहेत. ऐन रब्बी हंगामात हे संच मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सारोळा येथे लाभार्थी शेतकऱ्यांना ज्येष्ठ नेते सुरेश देवगिरे, शंकर इसाके, रमेश रणदिवे, ह.भ.प.रावसाहेब मसे व दलितमित्र पांडूरंग कठारे यांच्या हस्ते स्प्रिंकलर संचचे शनिवारी (दि.१३) वाटप करण्यात आले. सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करून हे संच उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे रब्बी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे आता सोयीस्कर होणार आहे. या संचचे ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले, आरपीआयचे तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे, माजी ग्रामपंचायत सदस्य खंडू शिंदे, प्रशांत पाटील, सौदागर कुदळे, दगडू जासूद, राहुल रणदिवे, चिकू हिडगे, अजित सिरसट, अनिकेत इसाके, प्रसाद इसाके आदींसह शेतकरी उपस्थित होते.


 
Top