उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील चिखली येथे ग्रामदैवत श्री संत शिवगुरू महाराज व सिद्धेश्वर महाराज प्रवेशद्वाराचे उद्घाटन ह.भ.प. नवनाथ महाराज चिखलीकर यांच्या हस्ते सोमवारी (दि.२२) करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, माजी जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप शिंदे, माजी जि.प सदस्य रामदास कोळगे, व्यंकट पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख, ग्रामपंचायत सदस्य तेजस सुरवसे, मार्तंड भोजने, प्रितीताई कदम, सिद्धेश्वर गवळी, दुष्यांत चोबे, बाजीराव जाधवर, शरद जावळे, सचिन काळे, हनुमंत पोंदे, प्रभाकर चव्हाण, सौदागर बोंदर, नेताजी चव्हाण, पत्रकार शाहरूख सय्यद आदींसह भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवेशद्वार उभारणीबद्दल सत्कार

चिखली चौरस्ता येथे भव्य-दिव्य प्रवेशद्वार उभारणीसाठी गत सहा महिन्यापासून परिश्रम घेवून उद्घाटन सोहळाही पार पडला. याबद्दल ग्रामपंचायत सदस्य तेजस सुरवसे, हनुमंत पोंदे व प्रभाकर चव्हाण यांचा धनंजय रणदिवे मित्रमंडळ, राजुरी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 


 
Top