तुळजापूर / प्रतिनिधी-

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव, विमा मिळावा या मागणीसाठी सुरु केलेल्या अन्नत्याग  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देविने सरकारला सदबुध्दी द्यावी यासाठी शनिवारी  दि. 20रोजी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी मंदीरात जावुन दंडवत घालत देविची पुजा करुन साकडे घातले.

 यावेळी जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, तालुकाध्यक्ष दुर्वास भोजणे, बापुसाहेब  भोसले, मोहन भोसले,धर्मराज पवार,किरण यादव,शेरा साळुंखे,,भैरु कदम,अण्णासाहेब साळुंखे,,नेताजी जमदाडे अदिसह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थितीत होते.


 
Top