तुळजापूर / प्रतिनिधी-

 एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढ धुडकवत शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी आंदोलन पुढे चालुच ठेवण्याचा निर्णय   तुळजापूर बस आगार मधील एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतला गेल्याने एसटी  आंदोलन गुरुवारी  चालुच असल्याचे  दिसुन आले

आ. पडळकर, आ. खोत हे राजकिय प्रैरित हेतुन आंदोलनात सहभागी झाल्याचा आरोप करुन या पुढे बेस्टचे नेते शंशाकराव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुढे चालु ठेवण्याचा निर्णय  कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे यावेळी स्पष्ट केले. या पुढे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे सांगुन शुक्रवार दि. २६रोजी आंदोलन पुढे चालुच ठेवण्याची सामुहीक शपथ घेवुन आंदोलन पुढे चालुच ठेवणार असल्याचे  एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले .

आजपर्यत या बस आगारातील अठरा कर्मचाऱ्यांनी निलंबित करण्यात आलेल्या अठरा कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. नंतर या सत्कार मुर्ती कर्मचाऱ्यांनी सदरील घातलेले हार फेटे बसस्थानक समोरील गेट ला घालुन शासनाचा निषेध केला  व  आंदोलनात एसटी कर्मचारी व त्यांचे संपुर्ण कुंटुंब सहभागी झाले होते.आता सामुहीक शपथ आंदोलन करणार आहेत.

 
Top