तुळजापूर / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूरात दिवसेंदिवस बालभिका-यांची समस्या वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर गुरुवार दि.२५ रोजी पोलिस प्रशासन चाईल्ड लाईन व समाजसेवक यांच्या मदतीने सकाळी ९ वाजता भवानी रोडवर भिक मागत फिरणा-या तिघांना ताब्यात घेतले.

यातील दोन बालकांना आईवडील नाहीत व एकाला वडील नसल्याची प्राथमिक माहीती आहे.तिर्थक्षेञी भाविकांचा ओघ वाढल्यामुळे मंदीर महाध्दार समोर भिकारी तसेच बालभिकारी यांचे प्रमाण वाढले आहे हे चोरी किंवा अन्य वाममार्गाला लागु नये यासाठी सामाजिक कार्यकते संजय बोंदर प्रयत्न करीत असतात.काही बालक भिक मागत असल्याचे स्थानिकांना निदर्शनास येताच ही माहीती पोलिसांना कळविण्यात आली.

यात स्थानिक नागरिक गुरुनाथ बडुरे, दिग्विजय पाटील,  सामाजिक कार्यकते संजय बोंदर  सह पेट्रोलिंग करीत असताना तिथे आलेले  सपोफो आरपी मुसळे यांनी संयुक्त पणे तिघांना ताब्यात घेतले यात महेश पांचगे (८)लोहीयानगर, कृष्णा पांचगे (१२), राहुल वाकुडे (८)यांना रेस्क्यु करुन बाल कल्याण समिती (न्यायपीठ )पुढे नेण्यात आले.

 
Top