तुळजापूर / प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावननगरीत सर्वञ गुटखा ग्राहकांना जादा दराने उपलब्ध होत असल्याने अन्नभेसळ अधिकारी वर्गाचा कार्यक्षमते बाबतीत प्रश्न निर्माण होत आहे.
सध्या तिर्थक्षेञ तुळजापूर च्या पंचक्रोषीत असणाऱ्या अनेक  गावांन मध्ये गुटखाचे मोठमोठे दलाल असुन हे गुटखा तिर्थक्षेञ तुळजापूरात हातोहात गर्दी चा अंदाज बांधुन पोहचवत आहेत.
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ देशाभरातुन विशेषता  आंध्र कर्नाटक  सह  महाराष्ट्र या राज्यातून भाविक भक्ति भावनेने आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात. शारदीय नवराञ उत्सव आरंभ ते दिपावळी सुट्यांन काळात भाविक तिर्थक्षेञी लाखोचा संखेने आले होते येत आहेत त्यामुळे या काळात तिर्थक्षेञ तुळजापूरात दररोज लाखो रुपयाची उलाढाल गुटखा विक्री तुन झाली आहे.  सध्या शहरातील अनेक कार्यालायातील कोपरे गुटखाच्या रंगाने रंगल्याचे दिसुन येत आहेत .
फेब्रुवारी 2021मध्ये पकडलेला साडेचोवीस लाखाचा पकडलेला गुटखा जाळुन नष्ट केला तुळजापूरात 24 फेब्रुवारी 2021 रोजी पकडण्यात आलेला २४५९५२९ रुपयाचा गुटखा नळदुर्ग रोडवरील नगरपरिषद डंपिंग ग्राऊंड येथे बुधवार दि.१० रोजी दुपारी जाळुन नष्ट करण्यात आला . १२/२/२०२१रोजी वाहन क्रमांक KA32D4402 मधुन २४५९५२०रुपयाचा गुटखा पकडण्यात आला होता याचे सँम्पल विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असता हे नमुने तपासून आले असता यात मँग्नेशियम कार्बोनेट टेस्ट पाँजीटीव्ह आली हे आरोग्य दृष्टीने घातक असल्याने १०/११/२०२१ सकाळी १०.३० ते १ वाजेदरम्यान जाळुन नष्ट करण्यात आल्याची माहीती अन्न सुरक्ष अधिकारी काकडे यांनी दिली.या कामी त्यांना नगरपरिषद कर्मचारी यांनी सहकार्य केले.



 
Top