उस्मानाबाद/प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड (मल्टिस्टेट) च्या २०२१-२६ पंचवार्षिक निवडणुकीसाठी उस्मानाबाद जनता बँक सहकार विकास पॅनलच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गांधी कॉम्प्लेक्स येथे बँकेचे ज्येष्ठ संचालक विश्वासआप्पा शिंदे यांच्या फीत कापून दि.१२ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.

यावेळी बँकेचे विद्यमान चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, व्हा.चेअरमन वैजनाथराव शिंदे, संचालक तानाजी चव्हाण, चंद्रकांत बागल, कमलाकर मुंडे, सुभाष धनुरे, निवृती भोसले, प्रदीप जाधव-पाटील, नंदकुमार नागदे, आशिष मोदाणी, राजीव पाटील, तुळजाभवानी बँकेचे चेअरमन संजय उर्फ सुहास केशवराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे, मधुकरराव तावडे, शिवसेनेचे बाळासाहेब शिंदे,  विजय मुद्दे, महेश देशपांडे, सोमनाथ चपने, पत्रकार धनंजय पाटील, प्रा.वसंत मडके, सिद्धार्थ बनसोडे, अग्निवेश शिंदे, उमेश राजेनिंबाळकर, रोहित पडवळ, बाळासाहेब मुंडे, रोहित बागल, धनंजय राऊत, अभिजीत देडे आदी उपस्थित होते.

 
Top