उस्मानाबाद / प्रतिनिधी-

काँग्रेसच्या उस्मानाबाद तालुकाध्यक्षपदी उपळा (मा.) येथील काँग्रेस पक्षाचे धडाडीचे व एकनिष्ठ कार्यकर्ते रोहित पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्र काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॕड.धीरज पाटील, लक्ष्मण सरडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. रोहित पडवळ गेल्या पंधरा वर्षापासून सार्वजनिक जीवनात असून त्यांनी जवळपास नऊ वर्षे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे तर चार वर्ष उस्मानाबाद तालुका अध्यक्ष म्हणून काम केले आहे.त्यामुळे सामाजिक कार्याचा त्यांना खूप मोठा अनुभव आहे. ते तुळजापूर विधानसभा मतदार संघातील माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांचे विश्वासू मानले जातात तर बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत असून सर्व संघटनेला ते बरोबर घेऊन जातील असा विश्वास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘प्रत्येक गावात गाव तिथे काँग्रेस पक्षाची शाखा’ हा उपक्रम वरिष्ठांच्या परवानगीने राबवणार आहे. तसेच उस्मानाबाद नगरपालिका व पंचायत समिती,जिल्हा परिषद या निवडणुकीत देखील कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांची शिफारस करणार आहे,असे ते म्हणाले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.


 
Top