तेर  / प्रतिनिधी-

 तेर, ता. उस्मानाबाद येथील ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य इर्शाद लियाकत मुलाणी यांनी अतिक्रमण केल्याचे सुनावणी मध्ये सिध्द झाल्याने जिल्हाधिकारी डॉ.कौस्तुभ दिवेगावकर यांनी मुलाणी यांंना अपात्र ठरवीत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

इर्शाद लियकत मुलाणी हे वार्ड क्रमांक ६ मधून सर्व साधारण जागेवर २०१७ च्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत. विजयी झाले होते. त्यानी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार माजी सरपंच महादेव भागवत खटावकर व नामदेव किसन कांबळे यांनी ३ नोव्हेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे केली होती

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी सुनावणी घेत गटविकास अधिकारी प.स. उस्मानाबाद यांच्या अहवाला आधारे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं) जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे अहवाल सादर केला. त्या अाधारे गैर अर्जदार मुलाणी यांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १६ अन्वये गैर अर्जदार इर्शाद मुलाणी यांना सदस्य म्हणून अपात्र करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबर २०२१ रोजी देण्यात आला.


 
Top