उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद दीपावलीच्या लक्ष्मीपूजना दिवशी म्हणजे रात्री 12 ते रात्री 12 पर्यंत प्रत्यक्ष ज्या मुलींचा जन्म झालेला असेल अशा शासकीय रुग्णालयातील प्रसूत झालेल्या सर्व मुलींचा सन्मान शंकर प्रतिष्ठान च्या वतीने येथील शासकीय स्त्री रुग्णालयात करण्यात आला लक्ष्मी आली घरा या योजनेअंतर्गत आठ वर्षापासून हा उपक्रम राबवला जात आहे शंकर प्रतिष्ठान चे अध्यक्ष ऍड राजेंद्र धाराशिवकर यांच्या अथक प्रयत्नातून आणि वडिलांच्या आशीर्वादाने ही योजना हा उपक्रम चालू आहे या योजनेअंतर्गत त्या जन्मलेल्या मुलीच्या व आईच्या नावे रुपये 7000 ची ठेव साधारण 21 वर्ष मुदतीने ठेवतात व मिळणारी ठेव ही मुलीच्या शिक्षणासाठी वापरली जाते सदर योजनेची व्याप्ती काही वर्षांमध्ये राज्य पातळीपर्यंत वाढविण्याचा संयोजकाचा संकल्प आहे शासकीय दवाखान्यात प्रसूत झालेल्या महिलांचा व अपत्याचा सन्मान केला जातो कारण साध्य परिस्थितीत शासकीय रुग्णालयातून प्रसूत होणाऱ्या महिलांचा खऱ्या गरजू असतात दीपावलीच्या दिवशी दरवर्षी सातत्याने मागील आठ वर्षापासून हा सन्मान शंकर प्रतिष्ठान यांच्यामार्फत केला जातो यावेळी सदर कार्यक्रम दि 05 नोव्हेंबर  21 रोजी संपन्न झाला .

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे तसेच तसेच डॉ स्मिता गवळी मुख्य अधिष्ठाता जिल्हा सरकारी महिला रुग्णालय उस्मानाबाद हे होते तर प्रमुख उपस्थिती दत्ता कुलकर्णी अध्यक्ष सिद्धिविनायक उद्योग समूह डॉ अभय शहापूरकर ज्येष्ठ बालरोग तज्ञ उस्मानाबाद तसेच डॉ मनोज घोगरे हेसुद्धा आवर्जून दरवर्षी या कार्यक्रमाला उपस्थित असतात आकाशवाणी केंद्रात समोरील शासकीय महिला रुग्णालयात हा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी दवाखान्यातील सर्व कर्मचारी दवाखान्यातील रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते त्यावेळी सौ अलका धाराशिवकर स्वरा ऋषिकेश धाराशिवकर संपूर्ण धाराशिवकर परिवार उपस्थित होते अत्यंत हृदयसर्शी कार्यक्रम सातत्याने होतो आणि कार्यक्रम घेण्यामागची आयोजकांची भावना अत्यंत महत्त्वाची आहे हा उपक्रम इतरही शहरातून जिल्ह्यातून चालू करावा स्त्रीभ्रूण हात्याचा समाजजीवनावर होणारा परिणाम व त्यामुळे एकूणच बिघडत चाललेला नैसर्गिक समतोल यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे असल्याचे सर्वच मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश धाराशिवकर यांनी केले


 
Top