उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ऐन िदपावलीच्या सणावर एसटी वाहक-चालक, यांत्रीकी कामगार यांनी अचानक संप पुकारल्याने शनिवार व रविवारी जिल्हयातील एसटी महामंडळाच्या बसेसची चाके थांबली.दिपावलीच्या सुट्टया संपल्यानंतर परत जाण्यासाठी प्रवाशांनी पुणे-मुंबई-बसेसचे आरक्षण ही केले  होते. परंतू या संपामुळे सर्व कांही विस्कळीत होऊन उस्मानाबाद एसटी विभागाचे ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. तर दुसरीकडे प्रशांना मोठ्या प्रमाणात मानसीक त्रासाला सामोरे जावे लागले.


                         सर्व छात्राचित्र-मुकेश नायगांवकर 

एसटी महामंडळाचे महाराष्ट्र सरकारमध्ये विलनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या कांही महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्याचे आंदोलन चालू होते. परंतू दिपावलीच्या सणामुळे व राज्य सरकार ने ८५ टक्के मागण्या मान्य केल्याचे सांगितल्यामुळे संप मागे घेण्यात आला होता. दिपावलीतील चार दिवसानंतर परत शनिवारपासून जिल्हयात एसटी वाहक-चालक व यांत्रिकी कामगार परत संपावर गेले आहेत. दिपावलीचा सण संपल्यामुळे अनेक प्रवाशी परतीच्या प्रवासासाठी आरक्षण काढून त्यांनी तयारी केली होती. परंतू ऐन वेळेस वाहक चालकांनी संप केल्याने प्रवाशांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. तर एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान सोसावे लागले. 

जिल्हयात कळंब डेपो वगळता पाच डेपो बंद आहेत. कळंब डेपोमध्ये ३०० ते ४०० कर्मचारी कामावर आहेत. तर पाच डेपो कार्यशाला यामधील १ हजार चालक व  ९८० वाहक व कांही  यांत्रिकी कामगार  संपावर आहेत.  जिल्हयात एकुण २ हजार ६०० कामगार आहेत. कळंब आगाराच्या एकुण ५० बसेस चालू आहेत. तर जिल्हयातील इतर ३10 बसेस बंद आहेत. त्याचप्रमाणे एसटी विभागीय कार्यशाळा व विभाग नियंत्रक कार्यालयामधील प्रशासकीय स्टाफ सर्व कामावर हजर असल्याचे सांगण्यात आले. 

६० लाख रुपयाचे नुकसान

उस्मानाबाद एसटी विभागात कळंब डेपो चालू असून ४०० कर्मचारी कामावर आहेत. जिल्हयातील इतर पाच डेपो बंद आहेत. उस्मानाबाद एसटी विभागाचे १  हजार चालक व ९८० वाहक तसेच कांही यांत्रिकी कामगार असे संपात सहभागी आहेत.विभागीय कार्यशाळा व विभागीय नियंत्रक कार्यालयातील सर्व स्टाफ कामावर उपस्थित आहेत.  शनिवार व रविवार प्रवाशांनसाठी  महत्वाचा दिवस असल्यामुळे मोठया प्रमाणात पुणे-मुंबई  व इतर लांब पल्याच्या बसेसचे आरक्षण प्रवाशांकडून करण्यात आले होते. त्यामुळे आमचे अपेक्षीत उत्पन्न  ६० लाख रुपये होते. परंतू या संपामुळे उस्मानाबाद विभागाचे ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

-अम्रता ताम्हणकर -विभागीय नियंत्रक एसटी महामंडळ उस्मानाबाद विभाग 



 
Top