उस्मानाबाद / प्रतिनिधी-

गवळी गल्लीत मानाचा गणपतीसमोर गवळी समाजाचा दीपावली पाडवानिमित्त शतकानुशतके चालत आलेली सगरपूजा कार्यक्रम आनंदात संपन्न झाला. 

सांस्कृतिक, सामाजिक,धार्मिक,कौटूंबिक वात्सल्य,स्नेहाचा परंपरेचा जपवणूक करणारा गवळीसमाज व पशुपालक यांचा गाई म्हशीचा सन्मानाचा लक्ष्मीपूजनाचे स्थान दिले जाते.वसुबारस या दिवसापासून गाई म्हशीना दहिभंडारा,हळद-कूंकू लावणे भाऊबीजेपर्यंत चालते.दिपावली पाडव्यादिवशी गाई-म्हशीची सजवून मिरवणूकीने सायंकाळी सगरपूजेसाठी उपस्थिती सुवासिनी ,बालगोपाल ,सहकुटूंब पूजाआरती-

नैवेद्धासह राहतात.समाजाचे कारभारी व जेष्ठ काशिनाथ दिवटे व भिमाशंकर दहिहंडे यांच्या हस्ते श्री पूजा श्रीफल वाढवून सुरूवात केली.प्रत्येक कुटूंब आपली गाय म्हैस,रेडा आणून सलाम केली जाते.दिवटे व दहिहंडे यांच्याहस्ते टिळा लावून ,पानसुपारी देऊन सन्मान केला.गवळी गल्लीतून सवाद्ध मिरवणूकीने काळा मारूती मंदिरात दर्शनाने सगरपूजेचा समारोप केला जातो.समाजाचे एकत्र येणे नव्या-जुन्या लेकी सुनांची भेटी आठवणीना उजाळा,गरीब श्रीमंत,वर्णभेद विसरणारा सोहळा होतो.यावेळी प्रा.गजानन गवळी, उमाभाऊ व राजकूमार दिवटे,नंदकुमार हुच्चे,मनोज अंजीखाने, लक्ष्मण मिसाळ,गिरजप्पा व दशरथ दहिहंडे, आपूणे ,पंगुडवाले,दहिहंडे,दिवटेमिसाळ,गवळी परिवार इ.हजेरी लावली.संतोष दहिहंडे यांनी दिपावली शुभेच्छा दिल्या.महिलांनी हळदी कूंकू लावून श्री गणपती व दुर्गामातेची आरती म्हणून,पूजारती करून,शोभेची दारू,फटाक्याच्या आतषबाजीने समारोप करण्यात आला.म्हशी पळविणे कार्यक्रम कोरोना विषारी रोगास आळा बसण्यासाठी रद्द करण्यात आला आह, असे संयोजक भालचंद्र हुच्चे यानी आभारासह सांगितले.


 
Top