उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन मौजे (उपळा ता.उस्मानाबाद) येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात उपळा व परिसरातील सर्व वयोगटातील ४८० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन राजाभाऊ पडवळ व डॉ.अजित निळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे एल.बी.बापू पडवळ, लक्ष्मण लामकाने, सरपंच बप्पा पडवळ, चिंटु पाटील, विक्रांत घोगरे, संतोष पडवळ, तानाजी घोडगे, शहाजी मुळे, आरोग्य केंद्राचे डॉ.गंगावणे, आशा कार्यकत्या कर्मचारी शिक्षक व शिक्षीका नागरीक मोठया प्रमाणात उपस्थीत होते. या कार्यक्रमाला जि.प.अध्यक्ष सौ.अस्मिताताई कांबळे व जि.प.सदस्य बापू शितोळे यांनी सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आत्मनिर्भर भारत जिल्हा संयोजक सचिन लोंढे यांनी केले. प्रस्ताविक एल.बी.पडवळ यांनी केले प्रस्ताविकात त्यांनी सांगीतले की आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात तेरणा जनसेवा केंद्राच्या माध्यमातुन हजारो लोकांवर मोफत सर्व रोग निदान उपचार केले जात आहेत व गंभीर आजावर शस्त्रक्रीया करण्याचे काम मुंबईच्या तेरणा हॉस्पीटल येथे केले जात आहे. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.ऋषीकेश आगरकर, डॉ.पंडीत गणवीर, डॉ. अन्सु कुमार, डॉ.धवल रंका, डॉ. लायर रोशन, डॉ.परवीन सय्यद, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवेच केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, नामदेव शेळके, नाना शिंदे, रवी शिंदे, संदिप चव्हाण, पवन वाघमारे, वैभव रेडे ईत्यादींनी परीश्रम घेतले.

 
Top