तुळजापूर  / प्रतिनिधी-

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवराञ उत्सव कोरोना पार्श्वभूमीवर साजरे होत असल्याने भाविकांच्या सुरक्षेतेसाठी दर तासाला मंदीरात औषधांची फवारणी केली जात असुन तापमान चेक केल्यानंतरच मंदीरात भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे. या साठी शंभर कर्मचारी कार्यान्वित केले आहेत .

ही  आरोग्य सुरक्षायंञणा मंदीर पोर्णिमे पर्यत अशीच कार्यान्वित राहणार आहे.भाविकांच्या आरोग्य सुरक्षीतेबाबतीत कुठलीही तडजोड स्विकारणार नसल्याची माहीती मंदीर समिती प्रशासनाने दिली.

 शहरात रोज स्वछता व पाणीपुरवठा - नगराध्यक्ष -रोचकरी

शहरात नगरपरिषद वतीने भाविकांच्या  आरोग्य सुरक्षेसाठी सातत्याने सर्वञ फवारण्या केल्या जात आहेत तसेच कचरा पडला की तो लगेच तातडीने ट्रँक्टर मधुन उचलला जात आहे या साठी नगरपरिषद ने जादा कर्मचारी कार्यान्वित केले असुन पाणीटंचाई भासु नये म्हणून दररोज याञा कालावधीत पाणीपुरवठा केला जात आहे,अशी माहीती नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली.

 
Top