तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवातील पाचव्या माळे दिवशी दुपारी तासभर झालेल्या पावसात भाविकांनसह व्यापारी वर्गाची धावपळ उडुन एकच तारांबळ उडाली.  रविवारी दुपारी अडीच वाजता अचानक पावसास आरंभ झाला हा मध्यम स्वरुपाचा पाऊस होता तो तासभर बरसला.

या पावसामुळे देवीदर्नशनार्थ आलेल्या भाविकांना आश्रय घेण्यासाठी ठिकाणा नसल्याने  पावसाचा सरी अंगावर घेत देवीदर्शन घ्यावे लागले या कालावधीत पळापळी झाली व भाविकांनी गाव गाठणे पसंत केल्याने बसस्थानकावर एकच गर्दी झाली रिक्षाचालकांनी या कालावधीत आपला दर वाढवल्याने भाविकांना अर्थिक फटका सहन करावा लागला तर रस्त्यावर बसणा-या किरकोळ व्यापारी वर्गाचे या पावसात माल भिजुन काही प्रमाणात नुकसान झाले.

 
Top