उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 नवनिर्मितीसाठी प्रेरणा आवश्यक असते मात्र प्रेरणा मिळविण्यासाठी सभोवतालचे वातावरण चांगले असले पाहिजे. लहानपणीच एका चुकीमुळे मिळालेल्या शिक्षेमुळे जीवनात चांगल्या कार्याला चालना मिळून जीवन सफल करण्याची संधी मिळत गेली. या कार्याला सर्व आप्तसंबंधीयांनी, मित्रमंडळीनी मदत केली. जीवनात दिवसभर केलेल्या कार्याचे मनन करण्याची सवय प्रत्येकात असली पाहिजे आपल्याकडून काही चुका झाल्या का ? याचे मंथन करण्याची क्षमता फक्त आपल्यावर झालेल्या संस्कारामुळे होते. म्हणून जीवनात संस्कार महत्त्वाचे असतात आपल्या संस्थेतून विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच संस्काराचे धडे दिले जातात याचे कारण असे की आपल्या कार्यातून चांगलेच काम झाले पाहिजे ही विचार श्रेणी ठेवून प्रत्येकाने आपल्याला सवयी लावल्या पाहिजेत हे फक्त संस्कारशिलच करू शकतात. म्हणून प्रत्येकाने संस्काराचे धडे घ्यावे व द्यावे.ही नीती अवलंबली तर नैतिकता प्रत्येकात येते. संस्कार जर आपल्यात असतील तर चांगले कार्य होईल. चांगल्या कार्यातूनच चांगला समाज बनत असतो. म्हणून समाजाच्या उन्नतीसाठी व आदर्श समाज बनवण्यासाठी प्रत्येकाने संस्कारक्षम बनावे अशी अपेक्षा सत्कार मूर्ती शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे यांनी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुईभर येथे त्यांचे वय ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे अमृत महोत्सवी सत्कार सोहळा डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्था रुईभर व वृंदावन फाऊंडेशन धाराशिव , विवेक व्यासपीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमात बोलत होते.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आप्पा बाबामहाराज दत्त संस्थान, रुईभर हे लाभले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की आपली क्षमता न पाहता आपल्या कार्यातून आपले चांगल्या कामात नाव येईल असे वर्तन सर्वांनी करावे व समाजकार्यात सुद्धा प्रत्येकाने चांगले कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त  केली.

  सत्कार मूर्ती श्री सुभाष दादा  कोळगे यांचा सत्कार जगद्गुरु तुकोबाराय यांचे दहावे वंशज व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपुर चे सदस्य ह भ प शिवाजीराव मोरे महाराज देहूकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 ह भ प शिवाजीराव मोरे महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की रुईभर गावात डोंगराएवढ्या उंचीची माणसे लाभलेली आहेत. त्यामुळे अशा छोट्याशा गावात शिक्षणदानाचे पवित्र काम गेल्या पन्नास वर्षापासुन सुरु आहे लहान वयात एखादया कार्याचे स्वप्न पाहुन साकार करने सोपे नाही ते स्वप्न लहानपनील निश्चित करून साकार केले . आज पर्यावरण संतुलनाची आवश्यकता आहे. त्यासाठी विद्यालयातील सर्वांनी प्रत्येक वर्षी किमान एक तरी रोपटे लावून त्याचे संगोपन केले तर पर्यावरण संतुलन राहु शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

  मा. रियाजभाई सय्यद जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते , प्रगतिशिल भारतीय रस्ते मार्ग व पायाभूत सुविधा अभ्यासक, ठाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते यांनी ही याप्रसंगी मार्गदर्शन केले.

 याप्रसंगी मा.शेषाद्री आण्णा डांगे, हभप बाबुराव पुजारी, अॅड अनिल काळे, शिवाजी बारगुळे गुरूजी, प्रभाकर मुळे , यांनीही मार्गदर्शन केले.

 जयप्रकाश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिवकन्या सांळुके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण केले. दादांनी केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी मार्मीक भाषेत दिला.

 जयप्रकाश विद्यालयातील कर्मचाऱ्या तर्फे संस्थापक शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे यांच्या (अमृत महोत्सवानिमित्ता ) ७५ व्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील होतकरू, हुशार व गरजू ७५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

  याप्रसंगी मा.भगवान आबा गिरी , माजी जि.प. सदस्य श्री रामदास आण्णा कोळगे धाराशिव युवा सेना जिल्हाप्रमुख श्री अक्षय ढोबळे , धाराशिव तालुका शिवसेना उपप्रमुख श्री राजनारायण कोळगे , सरपंच श्री बालाजी कोळगे , सचिन पाटील अध्यक्ष वृंदावन फाऊंडेशन धाराशीव, पांडुरंग कोळगे , सदाशिव आप्पा कोळगे , प्रा. जयप्रकाश कोळगे , माजी सरपंच राजारामबापू कोळगे , विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिवकन्या सांळुके , इंदीरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासाहेब शेलार , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष कपाळे , श्री धनंजय भोसले , पर्यवेक्षक श्री के ए डोंगरे , गणपत बप्पा माने , शिवाजी पवार गुरुजी , पोपट नलवडे गुरूजी , पंचकोशितील आलेले मुख्याध्यापक व शिक्षक , मित्रमंडळी , नातेवाईक , माजी विद्यार्थी , ग्रामस्त , पालक , प्राध्यापक , विद्यालयातील शिक्षकवृंद , शिक्षकेत्तर कर्मचार, विद्यार्थी मोठया संखेने उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन कांबळे , विनय सारंग , तर आभार गणपती शेटे यांनी मानले.

 
Top