उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन रविवार दि.10 ऑक्टोबर २०२१ रोजी, मौजे अंबेजवळगे ता.उस्मानाबाद येथे सकाळी १०:०० ते ५:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराचा मंगरुळ व परिसरातील सर्व वयोगटातील 450 महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

या शिबीराचे उद्दघाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन डॉ.अजित निळे यांच्या हस्ते झाले. यावेळी पं.स.सदस्य मोहन साबळे, सरपंच आनंद कुलकर्णी, माजी सरपंच राजेसाहेब देशमुख, ग्रा.प.स. बालाजी जाधव, विनोद वायकळे, विजय बापु विधाते, रामा सरडे, अविनाश यादव, ग्रा.प.स. हनुमंत वाघमोडे, लक्ष्मण जाधव, संकेत बागवाळे, अतुल देशमुख, अमोल माळी, विशाल वायकुळे, व ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. ऋषीकेश जाधव, डॉ.आयुष गुप्ता, डॉ.आदित्य बोरकर, डॉ.जय गोयल, डॉ.प्रणित गणवीर, डॉ.परवीन सय्यद, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. यावेळी तेरणा जनसेवा केंद्राचे सुजित पाटील, विनोद ओव्हाळ, नाना शिंदे, पवन वाघमारे, संदिप चव्हाण, रवि शिंदे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा कार्यकर्ता व अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले.

 
Top