उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरात सर्व समाज बांधव सर्व महापुरुषाचे जयंती व शांती सलोखा राखण्यासाठी मिळून प्रयत्न करतात  हीच उस्मानाबाद शहराची परंपरा आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद येथे मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू प्रायमरी हायस्कूल खाजा नगर उस्मानाबाद येथे पैगंबर जयंतीनिमित्त पैगंबर सर्वासाठी या विषयावर व्याख्यान झाले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष उस्मानाबाद नगरीचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर हे होते. यावेळी ते बोलत होते.  प्रमुख वक्ते इस्लामी  स्कॉलर नौशाद उस्मान   यांनी आपल्या भाषणात पैगंबर विषयी सर्व माहिती दिली. 

 यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर प्रतापसिंह पाटील,  काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा  प्रगती पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत नानासाहेब पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, चर्मकार संघटनेचे राज्य युवक अध्यक्ष  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नितीन तावडे,  चर्मकार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष नितीन शेरखाने,  उस्मानाबाद शिवसेनेचे शहर प्रमुख पप्पू मुंडे, बहुसंख्याक सर्व समाज उपस्थित होता.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मौलाना अलिमुद्दिन यांनी केली तसेच आभार प्रदर्शन इफतेखार पटेल सर यांनी केले.  व्याख्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

 
Top