परंडा / प्रतिनिधी : - 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे शिंदे महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रवेश सुरू आहेत. परंडा तालुक्यातील कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित असलेल्या हॉटेल ,दुकान ,कारखाना  यामध्ये काम करणारे कामगार, अर्धवट शिक्षण सुटलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे .ज्यांना आपले अर्धवट शिक्षण पूर्ण करावयाचे आहे ,ज्यांना शिक्षणासाठी वेळ मिळत नाही अशा  विद्यार्थ्यांनी  मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन आपले स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ दीपा सावळे यांनी केले आहे .या अभ्यास केंद्रांमध्ये पूर्वतयारी अभ्यासक्रम ,बी ए, बी कॉम या अभ्यासक्रमाला दिनांक 25 ऑक्टोबर पर्यंत प्रवेश घेता येतील. यानंतर शंभर रुपये प्रतिदिन असी लेट फीस असणार आहे.तेव्हा 25 ऑक्टोबर च्या पूर्वी आपले प्रवेश निश्चित करावेत असे केंद्र संयोजक डॉ प्रशांत गायकवाड यांनी माहिती दिली.

 
Top