उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तेरणा नदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर प्रशांत आण्णासाहेब मदने हा तेर येथीलच १८ वर्षीय युवक मोटारसायकलसह वाहून गेल्याची  माहिती मिळताच जि. प.च्या मा.उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी तेर येथे भेट देवून पाहणी केली. 

सदरील दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना बोलून त्वरित शोध मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम घेऊन उस्मानाबाद चे तहसीलदार गणेश माळी दाखल झाले. तेरणा नदीच्या पात्रात शोध कार्य सुरुवात केली. परंतु दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोठा पाऊस सुरू झाल्यामुळें शोध मोहीम थांबवावी लागली. घटनास्थळी तहसीलदार गणेश माळी, तलाठी प्रशांत देशमुख, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी पो.ना.गजानन जिनेवाड यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्ते सोबत हिते.

मृतदेह सापडला

तेर येथील एक युवक दुचाकीसह वाहून गेल्यानंतर प्रशासनाने त्याची शोधाशोध केली. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थान टीम तहसीलदार गणेश माळी यांच्यासह येऊन तेरणा नदीपात्रात शोध माेहीम राबविण्यात आली. या दरम्यान दुसऱ्या दिवशी सदर युवकाचा मृतदेह सापडला आहे्‌. 

 
Top