भूम /प्रतिनिधी  : 

भूम नगर पालिकेने कार्यरत असणाऱ्या स्थायी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे . या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे . याचा लाभ न प च्या ५० स्थायी कर्मचाऱ्यांना होणार आहे . अशी माहिती उपनगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांनी दिली आहे .

शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना दि १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केला होता . नगर पालिका कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०१९ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळू लागला . या न प कर्मचाऱ्यांच्या १ जानेवारी २०१६ ते ऑगस्ट २०१६ या कालावधीतील फरकाची रक्कम देणे बाकी होते . तो फरक पाच सामान हप्त्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला . शासन निर्णयाप्रमाणे पहिला हप्ता जमा झाला . मात्र कोविड मुळे वर्षे होऊन गेले तरी फरकाचा दुसरा हप्ता जमा झाला नव्हता . भूम न प नेही कोविडचा सामना केला आहे . तरीही कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने  मुख्याधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना विचारात घेऊन गटनेते संजय गाढवे यांनी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय घेतला . तो जमा करण्यात आला . यामुळे न प कर्मचाऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार फरकाचा दुसरा हप्ता देण्यात बहुतेक  करुन भूम न प जिल्ह्यात अग्रेसर ठरली आहे . २०११ पर्यंत भूम न प च्या कर्मचाऱ्याच्या पगारी वेळेत होत नव्हत्या . गटनेते संजय गाढवे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे कर्मचाऱ्याच्या पगारासाठी लागणारे अनुदान पुरेसे येत असून आजतागायत पगारी वेळेत होत आहेत . असे कर्मचाऱ्यांनी सांगतिले . यावेळी अव्वल लिपिक तुकाराम माळी , राजाभाऊ आहरेकर , अनिल होळकर , महेंद्र गजभिये , प्रकाश गाढवे , एम बी जाधव , के डी फुसके , डी डी शेंडगे , प्रदीप नाईकवाडी , रवींद्र भोसले , ब्रह्मदेव शिंदे , भगवान जाधव , तारकेश्वरी शिराळकर  यांच्यासह कर्मचारी हजर होते .

 
Top