उस्मानाबाद/ प्रतिनिधी- 

स्वयं शिक्षण प्रयोग उस्मानाबाद व सखी युनिक रुरल एंटरप्राइज यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या शहरांमध्ये ग्रामीण महिला व्यवसायिकांनी उत्पादीत केलेल्या दर्जेदार वस्तूंचे व खाद्यपदार्थांची तालुकास्तरीय विक्री प्रदर्शनास आजपासून  सुरुवात झाली आहे,हे प्रदर्शन दि.29 व 30 आॅक्टोंबर 2021 म्हणजेच आज व उद्या सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत आपल्या सर्वांच्या सेवेसाठी यशराज मंगल कार्यालय नगर परिषद नाट्य सभागृहा समोर उस्मानाबाद येथे भरले आहे.

स्वयंसेवी वस्तुंच्या भव्य प्रदर्शनास आपणही भेट देऊन आवडणा-या खाद्य पदार्थांची व वस्तुंची खरेदी करावी,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी केले. श्री राऊत यांनी प्रदर्शनात भरलेल्या महिला बचतगट,स्वयंसेवी संस्था, उपलब्ध धान्य,खाद्य पदार्थ व इतर वस्तुंची माहिती दिली.तर सुजाता ताई पाटिल यांनी आभार मानले.


 
Top