उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पिंच्याक सिलाट असोसिएशन उस्मानाबाद व तुळजाभवानी क्रिडा प्रबोधनी व फिटनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धेचे उद्घाटन बालाजी बनकर यांच्या हस्ते झाले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तालुका क्रीडा अधिकारी तसेच अर्जुन पुरस्कार विजेत्या सारिका काळे उपस्थित होत्या.

त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून तुळजाभवानी फिटनेस क्लब अध्यक्ष राम भुतेकर, हॅण्डबॉल असोसिएशनचे सचिव कुलदीप सावंत, सचिव योगेश थोरबोले ,फुटबॉल असोसिएशनचे सचिव शेख जावेद ,कुडो असो. उपाध्यक्ष दिनकर रोकडे, सुहास राऊत लेखापरिक्षक बार्शी, लखन मांडवे व विजय दत्तू सोलापूर उपस्थित होते स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पंच म्हणून बिरूदेव पुजारी, ओमकार वागस, महेश शिंदे यांनी कार्य केले विजेत्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते मिडल प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. उपस्थित प्रमुख पाहुणे बालाजी बनकर यांनी साहित्य खरेदी साठी पाच हजारांची प्रोत्साहनपर आर्थिक मदत जाहीर केली.


 
Top