उमरगा / प्रतिनिधी-

औद्योगिक वसाहतीतील वीजपुरवठा सुरळीत करणे, रस्त्यांची सुधारणा व रुंदी वाढवणे, नवीन स्ट्रीट लाईट पोल बसवणे व जुन्या स्ट्रीट लाईटची दुरुस्ती करणे, अवैध धंद्यांना आळा घालणे, वसाहतीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी उपायोजना करणे, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे आदी कामांसाठी आवश्यक निधीसाठी प्रस्ताव सादर करणे व उद्योजकांना सोयी-सुविधा पुरविण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिले.

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उमरगा एमआयडिसीतील विविध समस्यांच्या अनुषंगाने सोमवारी (दि.१८) रोजी उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. सदर बैठकीत त्यांनी, औद्योगिक क्षेत्रातील व खादी ग्रामोद्योग वसाहतीतील वाटप झालेले भूखंड, त्यावरील उद्योग, कामगारांची संख्या, शिल्लक भूखंड, रस्ते, वीज, व पाणीपुरवठा याशिवाय उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या इतर सोयीसुविधा व त्यांच्या समस्यांचा सविस्तर आढावा घेतला. औद्योगिक वसाहतीच्या हद्दवाढीसाठी परिसरातील शेतकऱ्यांचा संमतीसह प्रस्ताव पाठवणे, रोजगारासाठी स्थानिक युवकांना प्राधान्य देणे, औद्योगिक क्षेत्रात सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करणे, औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेच्या दृष्टीने त्याठिकाणी स्वतंत्र पोलीस चौकी निर्माण करणे, उद्योजकांसाठी उद्योग भवन उभारणे, कामगारांना ये-जा करण्यासाठी बससेवा सुरु करणे, वसाहतीत नरेगा अंतर्गत वृक्षलागवड  करणे आदी विषयी सदर बैठकीत चर्चा झाली. बैठकीस उपस्थित असलेल्या उद्योजक प्रतिनिधींनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासमोर विविध समस्या मांडल्या. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, प्रादेशिक अधिकारी, म.औ.वि.महामंडळ लातूर महेश मेघमाळे, संतोषकुमार चव्हाण, डी.व्ही.फताटे, नरसिंह जावळीकर, डी.एन.बिराजदार, संजय कौसडीकर,  धनंजय तोरणेकर, प्रमोदकुमार काकडे,  पी.बी.गोणारवार, जी.एस.भवड,  एस.बी.सिद, मुकुंद आघाव, दादा मोरे,  आर.एम.शेंडेकर, सतीश सिंदगी आदीसह उद्योजक संघटनेचे अनिल बिराजदार, नितीन होळे, मनोज थोरे, आनंद हिरवे, विजय तळभोगे, दिलीप गिरीबा, योगेश सारडा आदी उपस्थित होते.

 
Top