उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या महत्त्वकांक्षी कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामाची  मुख्य अभियंता विजय घोगरे मुख्य अभियंता जलसंपदा विभाग औरंगाबाद यांनी पदभार स्वीकारताच दोन दिवसीय क्षेत्रीय काम पाहणी दौरा नियोजित करून कामाची पाहणी केली.

 या प्रकल्पाचे अंमलबजावणीच्या प्रथम टप्प्यात २.२४ अघफु पाणी उचलण्याचे प्रस्तावित आसुन त्याद्वारे१०८६२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे दि १३/१०/२१ रोजी उपसा सिंचन योजना क्र २ अंतर्गत घाटणे बॅरेज टप्पा क्र १ ते रामदास साठवण तलाव टप्पा क्र ५ मधील घाटणे बॅरेज भोयरे ,पडसाळी कालवा,पडसाळी पंपगृह ,पडसाळी उद्धहरण नलिका ,दारफळ सावरगाव कालवा, सावरगाव पंपगृह ,सावरगाव उद्धहरण नलिका ,सावरगाव ते पांगरधरवाडी कालवा, पांगरधरवाडी पंपगृह ,पांगरधरवाडी ते मसला उद्धहरण  नलिका ,मसला ते सिंदफळ कालवा, सिंदफळ पंपगृह , सिंदफळ ते रामदरा उद्धहरण नलिका व रामदारा साठवण तलाव तसेच नळदृग बॅरेज क्र २ येथे क्षेत्रिय  दौरा करून संपूर्ण उपसा सिंचन योजना क्र २ टप्पा क्र १ ते ५ या कामाची पाहणी केली.

 तसेच दि १४/१०/२१ रोजी मिरगव्हाण ते सीना (ग्रॅव्हिटी मेन ) जेऊर बोगदा व मिरगव्हाण पंपहाऊस ची क्षेत्रिय पाहणी केली सदरील कामे विहित वेळेत व गुणवत्तापूर्वक पूर्ण करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी देऊन प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याबाबत करावयाच्या उपाय योजना बाबत त्यांनी मार्गदर्शन केले तसेच सुरू न झालेली कामे सुरू करणे प्रगतीपथावरील कामे डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणे बाबत सूचना दिल्या इंजिनीयर विजय घोगरे हे अत्यंत कार्यक्षम तत्पर तसेच अचूक निर्णय घेण्याची क्षमता असलेले अभियंता असल्याने कामांना गती येऊन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे त्यावेळी अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे कार्यकारी अभियंता कृष्णा घुगे ,प्रवीण चावरे ,निकिता हेमने, वसुंधरा दासरी तसेच विभागातील सर्व उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता उपस्थित होते.


 
Top