उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील बाळासाहेब ठाकरे नगर येथे लोकसेवा आयोग परीक्षेत यश संपादन करून पशुधन विकास अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल जिव्हाळा ग्रुप च्यावतीने डॉ. कल्पना पवार यांचा त्यांच्या स्वगृही जाऊन सत्कार केला २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये पशुधन विकास अधिकारी गट-अ जागेवर कल्पना गोवर्धन पवार यांची नियुक्ती झाली आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये व कोणतेही खासगी शिकवणी न लावता त्यांनी हे यश संपादन केले आहे त्यांचे प्राथमिक शिक्षण भाई उद्धवराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक शिक्षण रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथे घेऊन पदवीचे शिक्षण पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथे झाले आहे त्यांनी बी.व्ही. सायन्स अँड एच ही पदवी सुद्धा घेतलेली आहे पदव्युत्तर शिक्षण पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्था अकोला येथून घेतले व त्यानंतर त्यांनी नीट ची परीक्षा उत्तीर्ण होऊन २०१९ मध्ये लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा दिली व त्यामध्ये त्यांना हे यश संपादन झाले

   त्यांच्या या यशाबद्दल जिव्हाळा ग्रुप यांच्या वतीने त्यांच्या स्वगृही जाऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख तथा जिव्हाळा ग्रूपचे सभासद प्रशांत साळुंके महेंद्र शिंदे सुधीर बंडगर विपिन शिंदे अमोल कांबळे बाबुराव मैंदाड प्रमोद मेंगले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते

 
Top