ना मुंडे यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य बाकले यांची निवेदनाद्वारे मागणी


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या तडाख्यात पूर्णता उध्वस्त झाला असून प्रचंड संकटात सापडला आहे. मंत्री, पालकमंत्री, खासदार आमदार यांचे पाहाणी दौरे होऊनही शेतकऱ्यांच्या पदरात मदतीचा छदामही अद्याप पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आता अंत न पाहता तातडीने खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम द्यावी अशी मागणी सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे नामदार मुंडे आले असता त्यांची भेट घेऊन हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले की, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतीसह पिके पाण्यात आहेत. जनावरांचे गोठे, शेतातील माती, घरांची मोठी पडझड झाली आहे. शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांचे हातउसने पैसे देऊन खरिपाची पेरणी केली होती. मात्र अतिवृष्टीने पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात लोटला गेला आहे. दुष्काळ, अतिवृष्टीसह विविध संकटाने शेतकरी प्रचंड तणावाखाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या नुकसानीपोटी हेक्‍टरी 50 हजार, गोठ्याच्या पडझडीसाठी 10 हजार, घरांच्या पडझडीसाठी 25 हजार, मृत्युमुखी पडलेल्या जनावरांसाठी 20 हजार, जखमीं साठी 10 हजार मदत द्यावी. पीक कर्जाची वसुली थांबविण्याचे आदेश द्यावेत. नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर मदतीचे वितरण करावे. शेतकऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन मदतीचा निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बागले, वाघोलीचे उपसरपंच नितीन चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य मुकुंद पाटील, राहुल सुलाखे, राहुल खडके, गणेश मगर, साजिद शेख, विशाल खडके, आसिफ सय्यद आदी उपस्थित होते.


 
Top